रोजगार वाढावा, अवैध धंदे थांबण्यासाठी आंदोलन

लोकसंवादाच्या माध्यमातून होणाऱ्या या आंदोलनाला सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे;अर्चना घारे परब यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.२३-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे प्रशासनावर वचक नाही. तसेच निवडणुकीत रोजगाराचे गाजर दाखवून लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे आजची युवा पिढी अवैध धंद्यांकडे वळली आहे. परिणामी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंडे वाढले आहेत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. यासाठी येणाऱ्या काळात रोजगार मिळावा, अवैद्य धंदे थांबावे यासाठी महिला लोकसंवादाच्या माध्यमातून आंदोलन करणार असल्याची माहिती अर्चना घारे परब यांनी आज येथे दिली.

दरम्यान या आंदोलनात सर्व राजकीय पक्षांनी देखील पुढाकार घ्यावा. तालुक्यात वाढलेल्या अवैध धंदे यांना चाप बसण्यासाठी यात सहभागी व्हावे असे, आव्हाहन सुद्धा घारे परब यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page