फेब्रुवारी होणार फॉर्म भरण्यास सुरुवात;राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे – परब यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 8 हजार 69 जागा रिक्त आहेत. पुढिल महिन्यात फेसबुवारीत या परीक्षेसाठी ऑनलाईन फोर्म भरण्याची प्रक्रीय सुरू होणार आहे. काही मुलांना हे फॉर्म भरण्यास अडचणी येतात. त्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटर यासाठी पुढाकार घेऊन हे फॉर्म मोफत भरून देण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे-परब यांनी आज येथे दिली.
दरम्यान या परीक्षेचे फॉर्म भरणे अगोदर ही परीक्षा कशा प्रकारे असते यासाठी एक दिवस मार्गदर्शन शिबिराचा आयोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती घारे यांनी यावेळी दिली
यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,अफरोज राजगुरू, चित्रा देसाई,आदी उपस्थित होते.
