मालवण (प्रतिनिधी)
श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन – मालवण, ह्युमन राइट्स असोसिएशन आणि लायन आय हॉस्पिटल – कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर श्री दत्त मंदिर वायरी बांध मालवण येथे संपन्न झाले. या नेत्र तपासणी शिबिराचा ६० जणांनी लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदायाचे कार्याध्यक्ष श्री. कृष्णा बांदेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव श्री. भालचंद्र राऊत, तारकर्ली गावच्या सरपंच सौ. मृणाली मयेकर, ह्यूमन राइट्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष श्री. संतोष नाईक, डॉ. अशोक कदम, लायन आय हॉस्पिटलचे श्री. ऋषिकेश कोरडे, ह्युमन राईट्सचे मालवण तालुका अध्यक्ष श्री. सुधीर धुरी, संप्रदायाचे संचालक श्री. रविंद्र राणे, श्री. दादा झाड, डॉ. कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. साटलकर आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका सौ. प्राची परब उपस्थित होते.
शिबिराचा देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली गावातील ६० लोकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालचंद्र राऊत यांनी केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी संप्रदायाचे श्री. विनायक निवेकर, श्री. दत्ता माडये, श्री देवीदास खडपे, श्री. सतीश हिंदळेकर, श्री उमेश माडये, श्री. दत्तात्रय झाड, श्री. मिलिंद झाड, सौ. कविता हिंदळेकर, सौ. अदिती माडये, श्रीमती गोसावी तसेच ह्यूमन राइट्स असोसिएशनचे श्री. प्रमोद कांडरकर, श्री. राजेश कुमार लबदे, श्री. अर्जुन परब, श्री. रोहित हडकर यांनी विशेष मेहनत घेतली.
