रेवंडी येथे २५ ते २९ जानेवारी दरम्यान होणार विविध धार्मिक कार्यक्रम !

श्री देवी भद्रकाली मंदिर जीर्णोद्धाराचा वर्धापनदिन व माघी गणेश जयंती निमित्त आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

रेवंडी येथील श्री देवी भद्रकाली मंदिर जीर्णोद्धाराचा २३ वा वर्धापन दिन आणि माघी गणेश जयंती उत्सव दिनांक २५ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे.

यानिमित्त दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापना वर्सलदार मानकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ११:३० वाजता आरती दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद व रात्री ९:३० वाजता रंगमंच उदघाटन रात्री १०:३० वाजता ‘तुका म्हणे आता’ लेखक पु. ल. देशपांडे, सादरकर्ता स्वाती कदम यांचे दोन अंकी संगीत नाटक. २६ जानेवारी रोजी दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद, रात्री ९:३० वाजता स्थानिक कलाकारांचे नृत्याविष्कार, रात्री १० वाजता गोकुळचा चोर सादरकर्ते – सर्जेकोट ग्रामस्थ आणि शाळेतील मुले यांचे दशावतारी नाटक. दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, दुपारी ४ वाजता माता कलावती आई महिला भजन सर्जेकोट यांचे सुश्राव्य भजन, रात्री १० वाजता श्री भद्रकाली दशावतार नाट्य मंडळ पेंडुर यांचे दशावतारी नाटक. दिनांक २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री १० वाजता श्री स्वामी समर्थ मठ (समर्थ गड आडवली) या मठातून श्री भाई महाराज आपल्या सहकारी महिला व पुरुष समर्थगड सेवेकरी यांच्या समवेत येणार असून यावेळी वारकरी दिंडी आणि मठातील आरती सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी महाप्रसाद होऊन त्यानंतर दुपारी ३ वाजता श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक होणार आहे तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री भद्रकाली देवस्थान कमिटी तर्फे करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page