वीज संदर्भात धमकी देत फसवणुकीचे प्रकार

संबंधितवत कारवाई करा : माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडीत वीज जोडणी तोडण्याची धमकी देणारा मॅसेज पाठवत वीज ग्राहकांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.सदर व्हाट्सअप मेसेज मधील मोबाईल नंबरची माहिती घेऊन चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणीही माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की इलेक्ट्रिक सिटी पावर डिस्कनेक्शन असा हा फसवणूक करणारा मॅसेज असून नोटिफिकेशन अशा सदराखाली व्हाट्सअपवर इंग्लिशमध्ये मॅसेज काल 21 जानेवारी सावंतवाडीतील एका उद्योजक यांच्या मोबाईलवर व्हाट्सअपवर पाठविण्यात आला आहे. यात तुमचे इलेक्ट्रिक सिटी डिस्कनेक्ट रात्री 9:30 वाजता करणार, तुम्ही ताबडतोब या मॅसेज आलेल्या व्हॉट्स अप नंबरवर कॉन्टॅक्ट करा, असे नमूद केले आहे.

तसेच पुढे इलेक्ट्रिक सिटी ऑफिस थँक्यू असे इंग्लिशमध्ये म्हटले आहे. बोगस मॅसेज व्हाट्सअपवर पाठवून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत असताना याबाबत खात्री करण्यासाठी सावंतवाडी महावितरण कार्यालय येथे चौकशी केली असता, त्यांनी असा कोणताही मेसेज आम्ही पाठवत नाही, असे सांगितले. त्यामुळे याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ दखल घेण्याची गरज आहे असे ही सुरेश भोगटे यांनी म्हटल आहे.

You cannot copy content of this page