शिवसेना जिल्हा प्रमुख हे ठाकरेंच्या भाषेत ‘सूर्याजी पिसाळ’

भाजप नेते तथा चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांची संजय पडते यांच्यावर जोरदार टीका

*💫सावंतवाडी दि.१२-:* शिवसेनेला संपवण्यासाठी १५ वर्ष ज्यांनी काम केले होते त्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांना वडीलधाऱ्या व्यक्तींशी कसे वागावे हे शिकवण्याची गरज नाही. असा टोला भाजप नेते तथा चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी लगावला आहे. त्याकाळात आमदार वैभव नाईक व आमदार दिपक केसरकर यांनी शिवसेनेला संपण्यापासून वाचवले होते हे जिल्ह्यातील जनतेला ठावूक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले आहे. शिवसेनेच्या अनेक सच्चा कार्यकर्त्यांना तर आपण मारहाण केली असून, काही जण मरणाच्या दारातून परत आले असल्याचा गोप्य स्फोट त्यानी यावेळी केला आहे. तुम्ही १५ वर्षात केलेल्या पापांमुळे तुमची गणना ‘ठाकरे’ च्या भाषेत ‘सूर्याजी पिसाळ’ म्हणून केली जाते अशी टीका देखील परब यांनी केली आहे. जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व संपले असे म्हणणाऱ्या जिल्हा प्रमुखांनी पहावे जिल्ह्यातील ७० पैकी ५५ ग्रामपंचायतीवर भाजपने आपले सरपंच बसवले आहेत. तसेच यावेळी अमित परब यांनी भाजपच्या एकातरी कार्यकर्त्याला हात लावून दाखवा, माजी खासदार निलेश राणे हे तर खूपच लांब राहिले अशा शब्दात संजय पडते यांना प्रतिआवाहन दिले आहे.

You cannot copy content of this page