कणकवली खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी प्रकाश सावंत तर व्हाईस चेअरमनपदी सुरेश ढवळ

⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी प्रकाश सावंत तर व्हाईस चेअरमन पदी सुरेश ढवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृष्णकांत धुळप यांनी काम पाहिले.

कणकवली तालुका खरेदी विक्री
संघासाठी 7 जानेवारी झालेल्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युती व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत लढत झाली होती. यात सर्वच्या सर्व 15 ही जागा भाजपा बाळासाहेबांची शिवसेना युतीने मिळविल्या होत्या.
गुरुवारी झालेल्या चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठीच्या निवडीत चेअरमन पदासाठी प्रकाश सावंत व व्हाईस चेअरमन पदासाठी सुरेश ढवळ त्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आलेला असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर मावळते सभापती विठ्ठल देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी अभिनंदन केले.
यावेळी कणकवली तालुका खरेदी विक्री संघाचे नूतन संचालक किरण गावकर, अतुल दळवी, श्रीपत पाताडे, रघुनाथ राणे, संजय शिरसाट, प्रशांत सावंत, गुरुप्रसाद वायंगणकर, मिथिल सावंत, सदानंद हळदीवे, स्मिता पावसकर, विनिता बुचडे, गणेश तांबे, लीना परब तसेच संघाचे व्यवस्थापक गणेश तावडे, वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, नगरसेविका कविता राणे, राजन परब , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, सुशील पारकर, आनंद घाडीगावकर
आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page