सिक्युरिटी गार्डला डंपर चालकाने शिवीगाळ केल्याने मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक रोखली

*💫सावंतवाडी दि.१२-:* मळगाव येथे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने तेथील माइनिंग डंपर सोडण्यासाठी रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या दोन स्क्युरीटी गार्ड ना शिवीगाळ केली असून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही बातमी गावात समजताच मळगाव ग्रामस्थांनी डंपर वाहतूक अडवून ठेवली आहे. तसेच ती व्यक्ती या ठिकाणी येऊन माफी मागत नाही तो पर्यंत वाहतूक सुरू करणार नाही. माफी न मागितल्यास मेन रोडची वाहतूक देखील रोखून ठेवू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

You cannot copy content of this page