*चालक गंभीर जख्मी; अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मुंबई गोवा महामार्गावर वेत्ये येथे एका इनोवा गाडीचा अपघात झाला आहे. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, या अपघातात चालक गंभीर जख्मी झाला आहे तर आणखी एक व्यक्ती किरकोळ जख्मी झाली आहे. या अपघातातील जख्मी दोन्ही व्यक्तींना उपसरपंच गुणाजी गावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे.
