आरोग्य सभापती अँड.परिमल नाईक
*💫सावंतवाडी दि.२१-:* सतत वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्याचा शासनाचा निर्णय हा मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आत्मघातकी ठरू शकतो त्यामुळे शासनाने शाळा सुरू करण्याच्या संदर्भात फेरविचार करावा असे मत सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक व्यक्त केले आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर सगळ्यांचेच एकमत असले तरी दिवाळीनंतर कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव यावर शासनाने गांभीर्यपूर्वक विचार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.