नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव गाव मर्यादित आँनलाईन वक्तृत्व स्पर्धा “माझ्या स्वप्नातील गाव”या विषयावर आयोजित करण्यात आलेली होती.याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यात शालेय गट- प्रथम-वैदेही पारकर-नांदगाव मधली,द्वितीय-सलोनी शेलार-ओटव नांदगाव
तर उत्तेजनार्थ-१)सान्वी सुनिल महाडेश्वर ,२)रुद्र बांदिवडेकर असा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.स्पर्धेसाठी परीक्षण ओटव प्रशालेचे शिक्षक राजेश कदम यांनी केले आहे.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण व ट्रस्ट मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार 17 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10.30 वा.नांदगाव तिठा येथील आयडीयल कंप्युटर येथे आयोजित करण्यात आला आहे.
यशस्वी अनुक्रमे 1000 रु ,500 रुपये व उत्तेजनार्थ दोन 250 प्रमाणे ही रोख रक्कम सर्व पारितोषिके नवनिर्वाचित सरपंच रविराज ऊर्फ भाई मोरजकर पुरस्कृत देण्यात येणार असून याचा पारितोषिक वितरण सोहळा या दोन दिवसात होणार असल्याचे किशोर मोरजकर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page