⚡कणकवली ता.१६-: क्लिक टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक रवींद्र मर्ये यांना गिरगाव साहित्य संघात आयोजित करण्यात आलेल्या एकता कल्चर अकादमीच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार,प्रसिद्ध कवी अजय कांडर,
आणि “डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला” या लोकप्रिय गाण्याचे गायक अभिनेते नागेश मोरवेकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करून श्री मर्ये यांना गौरविण्यात आले.
मुंबई एकता कल्चर अकादमीतर्फे दरवर्षी सांस्कृतिक सामाजिक आणि उद्योजक क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या प्रबोधनकार ठाकरे युवा उद्योजक पुरस्कारासाठी क्लिक टेक्नॉलॉजीचे रवींद्र मरये यांची निवड करण्यात आली. रवींद्र मर्ये यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बावशी या छोटे खेडेगावातून मुंबईला नोकरीला येऊन आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला. आज क्लिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी नाव कमावले आहे. त्याची दखल घेऊन एकता कल्चर अकादमीचे अध्यक्ष प्रकाश ग जाधव आणि पुरस्कार निवड समितीचे सल्लागार कवी अजय कांडर यांनी सदर पुरस्कारासाठी श्री रवींद्र मरये यांची प्रबोधनकार ठाकरे युवा उद्योजक पुरस्कारासाठी एक मताने निवड केली होती.या पुरस्कार वितरण समारंभाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल देसाई, ज्येष्ठ हिंदी साहित्य रमेश यादव यांच्यासह साहित्य,चित्रपट,नाटक आदी क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
