एस टी च्या प्रत्येक चालक व वाहकाने चित्त एकाग्र करून सेवा दिली तर ती अधिक सुरक्षित ठरेल

देवगडचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे प्रतिपादन

⚡देवगड ता.१६-: एसटी सेवा ही आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे .राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी बद्दल आजही जनमानसात आपुलकी असून ही आपुलकी जोपासत असताना प्रत्येक चालकाने वाहकाने आपले चित्त एकाग्र करून खाकी वर्दीचा मान ठेवुन सेवा दिली तर निश्चित आपली सेवा सुरक्षित होईल त्याचबरोबर आपल्या सेवेत कमीत कमी इंधनाचा वापर करून इंधन बचत केली तर आगाराचे उत्पन्नही वाढेल व आगार बरोबर राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लागेल .सेवेतील सुरक्षिततेबरोबर इंधन बचतीस ही महत्व आहे.असे प्रतिपादन देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी देवगड आगारात बोलताना व्यक्त केले.

देवगड आगारातील दि.१६ जाने ते १५ फेब्रुवारी या कालावधीत इंधन बचत मासिक सप्ताह शुभारंभ पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे ,विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांच्या हस्ते दिपप्रजवलन करून करण्यात आले यावेळी,पोलीस हवालदार फकरुद्दीन आगा,पोलीस कॉन्टेबल निलेश पाटील,लेखाधिकारी श्रीकांत शेळके,वरिष्ठ सहाय्यक कुंदा गोलतकर,कनिष्ठ सहाययक प्रवीण तिर्लोटकर वहातुक नियंत्रक लक्ष्मण खरात ,तुकाराम देवरुखकर अन्य चालक वाहक कार्यशाळा कर्मचारी,उपस्थित होते .स्वागत प्रास्तविक स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी केले.

यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी दयानंद मांगले यांनी इंधन बचत ही काळाची गरज असून मार्गावर प्रवाश्यांची चढउतार करताना गाडी बंद करावी. वेग मर्यादा पाळून गाडीचे वेगावर नियंत्रण ,ठेवून इंधन बचत करावी असे आवाहन केले.
या शुभारंभाच्या निमित्ताने देवगड आगारात माहे डिसेंबर महिन्यात सर्वाधिक केपीटीएल (४५.८२ )ठेवणाऱ्या चालक व्ही.आर मांदळे यांचा पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
या पुढे बोलताना श्री बगळे म्हणाले,आपल्या खाकी वर्दी कौतुक होईल असे वर्तन करीत असताना सेवेत असताना व्यसनांपासून दूर राहून आपली सेवा ही निरंतन सेवा असून ती आत्मीयतेने बजविणे महत्वाचे आहे.सेवेतील सुरक्षिततेबरोबर इंधनाची बचत केली तर आपली सेवा खऱ्या अर्थाने यशस्वी होते असेही ते म्हणाले.
या वेळीं इंधन लिपिक प्रवीण तिर्लोटकर यांनी केपीटीएल डायरी व इंधन बचतीबाबत मार्गदर्शन केले.
स्थानक प्रमुख श्रीकांत
सैतवडेकर ,यांनी इंधनबचती बाबत उपस्थित कर्मचारी याना मार्गदर्शन केले.सूत्रसंचलन आभार वहातुक नियंत्रक तुकाराम देवरुखकर यांनी मानले.

You cannot copy content of this page