आघाडीच्या आरती परब यांचा केला पराभव
⚡बांदा ता.१३-: इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत भाजपच्या कृष्णा सावंत यांनी आघाडीच्या सौ. आरती परब यांचा ६ विरुद्ध चार मतांनी पराभव केला.
इन्सुली ग्रामपंचायत कार्यालयात आज उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. उपसरपंच रामचंद्र विष्णू चराटकर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. काही दिवसांपूर्वीच कृष्णा सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे याठिकाणी भाजपचे संख्याबळ वाढले होते. त्यामुळे उपसरपंच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. कृष्णा सावंत यांना ६ तर सौ परब यांना ४ मते मिळाली. एक मत बाद झाल्याने सावंत हे २ मतांनी विजयी झालेत.
नवनिर्वाचित उपसरपंच सावंत यांचा माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जिल्हा ओबीसी सेल सचिव विकास केरकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर, स्वागत नाटेकर, सौ. वर्षा सावंत, सौ. नमिता नाईक, सौ. राधिका देसाई, ज्ञानेश्वर राणे, महेश धुरी, साबाजी पालव, महेंद्र पालव, रवी परब, सचिन दळवी, विवेकानंद नाईक, प्रकाश आईर, हरिश्चंद्र तारी, औदुंबर पालव, बापू कोठावळे, प्रदीप सावंत, प्रताप सावंत, शक्ती केंद्र प्रमुख नितीन राऊळ आदिसह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
