आडाळी, डींगणे, डोंगरपाल, नेतर्डे गावांत उद्या नदी संवाद यात्रा

चला जाणूया नदीला उपक्रमा अंतर्गत उपक्रम

बांदा/प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाअंतर्गत कडशी नदीच्या पात्रालगत असलेल्या आडाळी, डिंगणे, डोंगरपाल, नेतर्डे या गावांत नदी संवाद यात्रेचे आयोजन उद्या बुधवार दिनांक ११ रोजी करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता आडाळी येथे तर ११ वाजता डिंगणे, डोंगरपाल, नेतर्डे या एकत्रित गावांची यात्रा डिंगणे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
यापूर्वी २ जानेवारी रोजी पडवे माजगाव येथून संवाद यात्रेला प्रारंभ झाला होता. उद्या होणाऱ्या या यात्रेसाठी नदी वाहणाऱ्या वरील ४ गावातील मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, गाव पाणलोट समिती, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, ग्रामीण स्वच्छता उपविभागाचे उपअभियंता, वरिष्ठ भू वैज्ञानिक आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या नदी संवाद यात्रेत गावातील लोकांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यात येणार आहेत. तसेच चला जाणूया नदीला या उपक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. वरील गावातील सर्व शेतकरी, नदीप्रेमी ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नदी विषयी माहिती समस्या उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व कडशी नदीला अमृतवाहिनी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन चला जाणूया नदीचे समन्वयक जयेश सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page