विविध खेळाडूंचा भाजपातर्फे सत्कार

⚡वेंगुर्ला ता.०८-: राष्ट्रीयस्तरावरील हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणा-या महाराष्ट्र संघातून खेळणारे वेंगुर्ला तालुक्यातील खेळाडू हर्ष बोवलेकर (मठ), ओंकार गोसावी (वेतोरे-पालकरवाडी) तसेच राष्ट्रीय कब्बडी पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयेश परब (रामघाट रोड) यांचा भाजपचे वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.अमेय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपचे व्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण, प्रा. अमेय महाजन, प्रसन्ना देसाई, सुहास गवडळकर, राजन गिरप, बाबली वायंगणकर, मानवेल फर्नांडीस, दादा केळुसकर, शितल आंगचेकर, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, ईशा मोंडकर, बंड्या पाटील, पपू परब, प्रणव वायंगणकर, हेमंत गावडे, विजय बोवलेकर, कमलेश गावडे, अनिल तेंडोलकर, शेखर काणेकर, प्रशांत बोवलेकर, सुर्याजी नाईक, समीर गोसावी, किरण बोवलेकर, बाळकृष्ण येरम, समिर गोसावी, वृंदा गवंडळकर, संतोष साळगांवकर, सोमा मेस्त्री, छोटु कुबल उपस्थित होते.
फोटोओळी – राष्ट्रीय कब्बडी पंच परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जयेश परब याचा डॉ.अमेय देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page