रस्सीखेच स्पर्धेच उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड जकातनाका येथील रस्सीखेच स्पर्धेचा उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे.श्री माऊली कला क्रीडा मंडळ मुळेवाड नाईकवाडीकडून रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.आहेयाचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर मळेवाड सोसायटी चेअरमन प्रकाश पार्सेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक,माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,रमाकांत नाईक,विलास नाईक उपस्थित होते.यावेळी आपले मनोगत व्यक्त करत असताना हेमंत मराठे यांनी श्री माऊली कला क्रीडा मंडळाने स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

तसेच अशा स्पर्धामुळे गावातील नवोदित खेळाडूंना एक ऊर्जा मिळून खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा गावात आयोजित करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.तसेच याव्यतिरिक्त अन्य स्पर्धा या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केल्या जातात.त्याबद्दल मंडळाचे कौतुक केले.

मंडळाला आमचे नेहमीच सहकार्य लाभेल असे आश्वासित केले.तर बाळा शिरसाठ यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना स्पर्धेला शुभेच्छा देत शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदू नाईक यांनी केले.

You cannot copy content of this page