तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ९ व १० जानेवारी रोजी

⚡वेंगुर्ला ता.०७-: जिल्हापरिषद सिधुदुर्ग व पंचायत समिती वेंगुर्ला आयोजित ५०वे वेंगुर्ला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. ९ व १० जानेवारी रोजी वेंगुर्ला पाटकर हायस्कूलमध्ये आयोजित केले आहे.
९ जानेवारी सकाळी ९ वाजता विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती सहभाग नोंदणी, प्रदर्शन साहित्य मांडणी, लहान व मोठ्या गटा निबंध तसेच वक्तृत्व स्पर्धा, दुपारी २.३० वाजता गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हापरिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, जिल्हापरिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख व मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन, दि. १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दोन गटात प्रश्नमंजुषा, प्रतिकृती परिक्षण, दुपारी ३ वाजता गटविकास अधिकारी मोहन भोई यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक समारंभ होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक आत्माराम सोकटे व गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page