आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात उमेदवारांची चाचपणी सुरू

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची पाश्वभूमी

आंबोली,ता.७: आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार प्रयत्न उमेदवारांकडून होताना दिसत आहे. अजून आरक्षण जाहिर झाले नाही मात्र गृहीत धरून उमेदवारांची सध्या ट्रायल सुरू आहे. अनंत गावडे संदीप गावडे,दिनेश गावडे यांची ट्रायल चाचपणी सुरू आहे.

यावेळी भाजप कडून कोणाला उमेदवारी मिळते हा औत्सुक्याचा भाग आहे.मात्र जोरदार चढा ओढ आहे.भेटी गाठी आहे. शिवसेनेचे मात्र आस्ते कदम आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विभागीय अध्यक्ष बबन गावडे म्हणाले,सध्या आरक्षण अजून जाहिर झालेले नाही त्यामुळे कोणीही उमेदवार अजून शिवसेनेचा घोषित केलेला नाही. यावेळी नवीन आणि काम करणारा सक्षम लोकभावना समजून जनमानसात काम करून विकास करणारा आणि पक्षाचे नाव मोठे करणारा हुशार उमेदवार देण्याची मागणी कार्यकर्त्यांची पक्षाकडे म्हणणे मांडलेले आहे.कार्यकर्त्यांची भावना काय आहे याचा पक्षाने देखील अंदाज घेतलेला आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवार घोषित करणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आपला उमेदवार निवडून आणण्याइतके सक्षम आहेत असे बबन गावडे म्हणाले. एकंदरीत या मतदार संघात निवडणुकीत जिल्हा परिषद साठी उमेदवार हे नवखे असणार एवढे निश्चित. मात्र पंचायत समिती साठी मात्र सध्या तरी चढाओढ दिसत नाही.त्यामुळे या ठिकाणी नेमके काय आरक्षण पडते याकडे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page