⚡कणकवली ता.०७-: कणकवली येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलची नववीतील विद्यार्थिनी दुर्वा नागेश मुसळे हिने इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये ११ वा इंटरनॅशनल रँक, रिजनल रँकमध्ये ७ वा, झोनल रँकमध्ये ६ क्रमांक करत मेडल ऑफ डिस्टिंक्शन व सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन मिळवले आहे.
ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशनच्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत दुर्वा ही मेरिटलिस्टमध्ये येऊन दुसऱ्या राऊंडसाठी पात्र ठरली आहे. दुर्वा ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली तालुक्यात दुसरी तर जिल्ह्यात सातवी आली आहे. राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी ती पात्र ठरली आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल बाल शिवाजी इंग्लिश मीडियमच्या संस्थेच्या पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
