जि. प. प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ चा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव ७ व ८ फेब्रुवारीला

⚡मालवण ता.०७-: कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १ या प्रशालेला १५० वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत या शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे ठरविले असून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीतर्फे दि. ७ व ८ फेब्रुवारी रोजी शतकोत्तर सुवर्ण महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

यानिमित्त दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून यामध्ये प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पालक व माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ, रात्री ८:३० वाजता प्राथमिक शाळा कांदळगाव नं. १, कांदळगाव परबवाडा तसेच ओझर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद, सायंकाळी ७:३० वाजता ज्येष्ठ कवी दादा मडकईकर यांचे सुस्वर कविता गायन, रात्री ९ वाजता विविध मान्यवर व माजी शिक्षक विध्यार्थी यांचा सत्कार होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुहास पेडणेकर, उद्योजक डॉ. दिपक परब, ओझर विद्यामंदिरचे कार्यकारी अधिकारी जी. एस. परब उपस्थित राहणार आहेत. रात्री १० वाजता गावातील माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या महोत्सवात आजी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन समिती अध्यक्ष प्रशांत पारकर, उपाध्यक्ष सत्यवान परब, सुधाकर राणे, सचिव पांडुरंग राणे, खजिनदार आशिष आचरेकर, सल्लागार उमेश कोदे व सदस्य यांनी केले आहे.

You cannot copy content of this page