जिल्ह्याचे तीन मंत्री असताना खाजगी कंपनीला घ्यावा लागतो मेळावा

हे जिल्ह्याचे दुर्दैव: ठाकरे गटाच्या रुपेश राऊळ यांचा आरोप

सावंतवाडी ता.०७-: जिल्हातील तीन तीन मंत्री असताना खासगी कंपन्यांना रोजगार मेळावा घ्याव लागतो. हे खरखरोच जिल्ह्याचे दुर्देव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केला. निवडणूका आल्या की जनतेला रोजगाराची आशा दाखावयची. मात्र एकाही मंत्र्यांना रोजगार मेळावा घेता आकेला नाही, असे यावेळी राऊळ यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथील शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना राऊळ म्हणाले की काल झालेला रोजगार मेळावा हा पूर्णपणे अपयशी ठरला असून अनेक युवकांना उनात तानतास थांबावे लागले. परंतु त्याच्या हाताला मात्र काही मिळाले नसल्याचेही राऊळ यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान केंद्रात, राज्यात सत्ता असताना सुद्धा जिल्ह्यातील मंत्री रोजगार देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला.

यावेळी चंद्रकांत कासार, कृतिका दळवी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page