विनयभंग केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींची शिक्षा कायम

जिल्हा न्यायलयाने शिक्षा कायम ठेवत न्यायालयीन कोठडीत केली रवानगी;अँड रुपेश देसाई यांनी पाहिले काम

सिंधुदुर्गनगरी ता अल्पवयीन युवतीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी उभादांडा वेंगुर्ला येथील दोघांची आज येथील जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम करत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्रथमेश उर्फ बाबल्‍या रवींद्र मांजरेकर, कौशिक लक्ष्मण मोर्जे अशी त्या दोघांची नावे आहेत हा गुन्हा 3 सप्टेंबर 2013 ला दाखल करण्यात आला होता संबंधित पीडित महिलेने दिलेल्या तक्रारी नुसार त्या दोघांनी आपला पाठलाग करून संबंधित दोघांनी विनयभंग केल्याचे म्हटले होते त्यानुसार वेगुला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान प्रथम वर्ग न्यादंडाधिकारी यांनी त्यांना एक वर्ष साधी कैद व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती या शिक्षेच्या विरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयाकडे अपील केले होते. मात्र ती शिक्षा कायम ठेवत त्यां दोघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश जिल्हा न्यायलयाने दिले आहेत या कामी सरकारी पक्षातर्फे अँड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले आहे.

You cannot copy content of this page