ग्लोबल फाउंडेशन मार्फत देवगड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती

⚡देवगड ता.२८-: शेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल देवगड या प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेमार्फत दरवर्षी गरीब होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती दिली जाते.

यावर्षी प्रशालेतील कुमारी गौरी समीर वेतकर, कुमारी कशिश रविंद्र मिठबांवकर, कुमार आयुश नथुराम भाबल, कुमार अथर्व राजेंद्र कोयंडे, कुमारी निधी नामदेव पराडकर या पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये ३६००/- शिष्यवृत्ती देण्यात आली. ग्लोबल फाउंडेशनचे संचालक प्रसाद परब व गुरु देसाई यांनी या विद्यार्थ्यांची निवड केली. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक संजीव राऊत व पर्यवेक्षक . सुनील घस्ती आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे व ग्लोबल फाउंडेशनचे आभार मानले आहेत.

You cannot copy content of this page