देवगड
तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पूल या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना ,पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड झाले आहे. या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास १० जानेवारी रोजी तारामुंबरी नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देवगड तालुका मनसे माजी पदाधिकारी यांनी उपअभियंता सा.बा.उपविभाग देवगड यांचेकडे याना लेखी पत्राद्वारे शाखा अभियंता श्री गायकवाड यांचे कडे दिला आहे.
यावेळी मनसे माजी तालुका अध्यक्ष चंदन मेस्त्री, माजी तालुका सचिव जगदीश जाधव,माजी शहर अध्यक्ष सचिन राणे,माजी उपतालुका अध्यक्ष राजा मोंडकर,माजी विभाग अध्यक्ष परेश आडकर उपस्थित होते
या निवेदनात नमूद केले प्रमाणे तारा मुंबरी नाका ते तारामुंबरी पूल हा रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला असून या मार्गावरून दुचाकी,चारचाकी,चालविणे अवघड झाले आहे प्रसंगी छोटे मोठे अपघात पादचारी याना दुखापत ,होत आहेत.गाड्या खड्ड्यांमुळे नादुरुस्त होत आहेत
या पूर्वी वारंवार विनंती तसेच स्थानिक नगरपंचायत प्रशासन यांचेकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या पूर्ण रस्त्याची नव्याने दुरुस्ती करण्यात यावी अथवा सद्यस्थितीत शालेय सहली,तसेच नववर्ष स्वागत करिता येणारे वाढते पर्यटक लक्षात घेता या मार्गावरील खड्डे ही तात्काळ बुजवावेत.अन्यथा १० जानेवारी रोजी तारामुंबरी नाका येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसे माजी पदाधिकारी यांनी दिला आहे.
तारामुंबरी नाका ते तारामुंबरी पुल रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा
