मंत्री केसरकर यांच्यावर बोलण्याची रुपेश राऊळ यांची उंची नाही

निमंत्रण दिले असताना भाजप पदाधिकारी उपस्थित राहिले नाही; शिंदे गट तालुकाप्रमुख बबन राणे यांचा राऊळ, संजू परब यांना प्रतिउत्तर

⚡सावंतवाडी ता.२७-: तीन वेळा आमदार निवडून आलेल्या शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यावर बोलण्याची आपली उंची नाही, असा पलटवार शिंदे गटाचे तालुकाप्रमुख बबन उर्फ नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर केला आहे.दरम्यान मोती तलाव येथील काल झालेला कठड्याचे भुमिपूजन निमंत्रण हे भाजप नेते व पदाधिकाऱ्यांना दिले असताना ते उपस्थित राहू शकले नाही. तो आमचा दोष नाही. त्यामुळे संजू परब खोटं बोलू नये, असा सल्लाही बबन राणें यांनी यावेळी परब यांना दिला.

यावेळी राणे पुढे बोलताना म्हणाले की येणाऱ्या काळात तुमच्याबरोबर किती कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत हे दिसेल असा टोलाही यावेळी राणे यांनी रुपेश राऊळ यांना लगावला. ते आज येथील केसरकर यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बाबू कुडतरकर, विशाल बांदेकर, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page