Headlines

तळेरे येथील सांगितिक महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद

सुधीर पोटे, अजित गोसावी यांच्या गायनाने महोत्सवात रंगत

⚡कणकवली ता.२६-: भाग्यलक्ष्मी सोनू संगीत साधना संचालक अजित गोसावी यांच्या विद्यार्थी परिवारच्यावतीने आयोजित करण्यात आलेला सांगितीक महोत्सव तळेरे याठिकाणी संपन्न झाला. पं. डॉ. सुधीर पोटे यांच्या हस्ते या महोत्सवाला प्रारंभ झाला.
या कार्यक्रमाचे संचालक अजित गोसावी यांनी प्रास्ताविक केले. उदघाट्न प्रसंगी संचालक अजित गोसावी यांचे गुरुजी पं. डॉ. सुधीरजी पोटे, सरपंच, पालकवर्ग, विद्यार्थी, देवस्थानचे मानकरी उपस्थित होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विद्यार्थ्यांचे अभंग गायन झाले. यात निलेश म्हाडगुत, श्रवण लिंगायत, ईश्वरी कदम, सचिन साईल, पोयेकर, ध्रुव गोसावी, स्वरा म्हाडगुत, संदीप नांदोस्कर, रुपेश मेस्त्री, अनिकेत कुलकर्णी, प्रणव घाडी, निशांत पांचाळ, लाड, पाटकर, भूषण घाडी, राऊत, आजगावकर, सानिया गोसावी, अक्षय परुळेकर, गणेश मेस्त्री, आर्या घाडी, विघ्नेश तारी, दिशा परब, देवरुखकर, वृंदा दळवी, कदम, सुंदर मेस्त्री, सागर राठवड, चिन्मय सावंत अन्य विध्यार्थ्यानी गायन केले. त्यानंतर विशारद विद्यार्थी वैष्णवी धुरी, संपदा पवार, भार्गव गावडे, रत्नदीप सावंत, राजेश गुरव यांनी ख्यालगायन केले.त्यानंतर संगीत अलंकार सौ. नूतन परब यांनी शास्त्रीय उपशास्त्रीय गायन केले. त्यांना तबला साथ किशोर सावंत आणि हार्मोनियम उमेश परब यांनी केले. त्यानंतर संचालक अजित गोसावी यांचे गुरु सुधीर पोटे यांनी गायन आणि मार्गदर्शन केले. त्यांना तबला साथ अजित गोसावी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात तबला, पखवाज साथ दीपक मेस्त्री, प्रणव मेस्त्री, संदीप मेस्त्री यांनी केले. तर तालरक्षक म्हणून भार्गव गावडे आणि विघ्नेश तारी यांनी केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांचे पखवाज सोलोवादन झाले. यात अमित गोसावी,रितेश पांचाळ, हरिदास घेवडे, आयुष घाडी, मयुरी तळेकर, आश्मेश लवेकर, आदित्य सूद, रोहित पाळेकर, साहिल लाड,यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे निवेदन राजेश गुरव आणि गणेश मेस्त्री यांनी केले.

You cannot copy content of this page