मंत्री दिपक केसरकर;विकासाच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना-भाजपची युती पुढच्या काळात टिकवणार..
⚡सावंतवाडी ता.२५-: खोके, खोके म्हणून आम्हाला हिणवनाऱ्यांनीच खोके घेतले आहेत आशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी विरोधकावर केली.ते सावंतवाडी येथील बाळासाहेबांची शिवसेनेच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
ते म्हणाले आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप होत आहे परंतु आरोप करणाऱ्यांनी खोके घेतले आहे हे जे खोटे आरोप करत आहेत त्यांच्यापासून सिंधुदुर्गातील जनतेला बाहेर काढून वस्तुस्थिती समजावली पाहिजे या पुढच्या काळात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले पाहिजे बाळासाहेबांनी शिवसेना-भाजपची युती केली ही युती या पुढच्या काळात टिकली पाहिजे असे केसरकर म्हणाले.
ग्रामपंचायत च्या विकासासाठी आवश्यक निधी या पुढच्या काळात देण्यात येईल या निधीचा वापर जनतेच्या विकासासाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले या पुढच्या काळात भाजप आणि बाळासाहेबांचे शिवसेना यांच्यात युती होईल असे केसर करण्यास स्पष्ट केले पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोल्हापूरच्या कणेरी मठाला भेट देतील असेही केसरकर यांनी सांगितले.
