शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचे फोंडाघाट येथे प्रतिपादन
⚡कणकवली ता.२४-: फोंडाघाट शैक्षणिक संस्थेने कठीण परिस्थितीवर मात करत गुणवत्तेचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय घेऊन आत्तापर्यंत काम केले आहे. त्यामुळे मी खात्रीने सांगतो येथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या आणि योग्य शैक्षणिक संस्थेच्या हातात आहे असे गौरवोद्गार कोकण मतदार संघाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी काढले.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ दरम्यान ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर साहस प्रतिष्ठान वेंगुर्लाच्या अध्यक्ष रुपाली पाटील, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी चेअरमन सुभाष सावंत,खजिनदार आनंद मर्यें, सदस्य स्कूल कमिटी चेअरमन बबन पवार ,रंजन नेरूरकर, कवी शशिकांत तिरोडकर, एलएमसीचे केदार रेवडेकर, मुख्याध्यापक शंकर सावंत,लिटिल फ्लॉवर इंग्लिश मेडीयम स्कूलच्या प्रिंसिपॉल विनया लिग्रस, शाळा व्यवस्थापन् समिती सदस्या सौ. रेवडेकर,फोंडेकर गुरुजी,काका कारेकर,करुळ हायस्कूल मुख्याध्यापक नारकर उपस्थित होते
कोकण मतदार संघाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील म्हणाले, फोंडाघाटच्या या शिक्षण संस्थेने तसेच विद्यार्थ्यांनी जिद्दीने काम करण्याची यशाची परंपरा कायम राखलेली आहे आत्ताच झालेल्या एसएससी परीक्षेमध्ये या फोंडाघाट स्कूलने जवळपास 39 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त गुण मिळवून दाखविलेले आहे संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे हे कार्य फार कौतुकास्पद आहे. आपल्या शैक्षणिक संस्थेचा यशाचा आलेख चढता राखताना एखाद्या यशस्वी शैक्षणिक संस्थेला आवश्यक त्या सर्व गोष्टी या संस्थेने मिळून दाखविलेल्या आहेत. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेला मोठे होताना माझ्याकडून कशी मदत होईल यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील राहील असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्यार्थिनी कडून ईशस्तवन व स्वागत गीत गाऊन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रकलेचे चे प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन तसेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर फोंडाघाट हायस्कूलमधून शैक्षणिक पातळीवर तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोईल यांनी केले.
