वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचे खा राऊत यांनी केले अभिनंदन

विकासकामांसाठी शिवसेना ठाकरे गट सदैव पाठीशी असल्याचा दिला विश्वास

⚡सावंतवाडी ता. २४-: शिवसेनेकडून निवडून आलेल्या वेत्ये गावचे नवनिर्वाचित सरपंच गुणाजी गावडे यांचा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी गावच्या विकासासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही नक्कीच करू. तसेच उद्धव बाळासाहेब गट तुमच्या पाठीशी कायम उभा राहिल, असा विश्वासही श्री.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाळा गावडे, चंद्रकांत कासार आदी पदाधिकारी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page