हडी जेष्ठ नागरिक संघाचा २५ डिसेंबरला वर्धापनदिन !

⚡मालवण ता.२३-: फेसकॉम संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीचा पंधरावा वर्धापनदिन सोहळा हडी जठारवाडी शाळा नंबर २ येथे २५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सकाळच्या सत्रामध्ये सकाळी १० ते २ या वेळेत मोफत नेत्र शिबीराचे आयोजन विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रामध्ये दुपारी २.३० वा.उद्घाटन दिप प्रज्वलन , संघाचे जे सभासद निधन पावले त्यांना संघाच्या वतीने २ मिनिटे श्रध्दांजली, त्यानंतर साने गुरुजीच्या प्रार्थनेने सुरुवात, प्रमुख पाहुण्यांची ओळख परिचय संघाच्या अध्यक्षा
श्रीम. चंद्रकला कावले करतील.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होईल. दुपारी ३.१५ ते ३.३० वा. वैवाहिक जीवनात ५० वर्ष पूर्ण झालेल्या उभयतांचे सत्कार, दुपारी ३.३० ते ५ वा हभप श्री. हृदयनाथ गावडे यांचे कीर्तन, सायं. ५ ते ५.१० वा.आभार, अल्पोपहार पसायदान सांगता होणार आहे. उपस्थितीचे आवाहन संघाच्या वतीने अध्यक्ष श्रीमती चंद्रकला कावले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page