२५ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचा सत्कार समारंभ

सरपंच ग्रामपंचायत सदस्य करण्यात येणार सत्कार

⚡मालवण ता.२३-: मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे होणार आहे.
या कार्यक्रमास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page