⚡मालवण ता.२३-: मालवण येथील बोर्डिंग मैदानावर तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत येथील चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयाच्या तब्बल १७ विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत पदक प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांनी गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांबउडी, १०० व २०० मीटर धावणे तसेच रिले या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. पदक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे- गोळाफेक, २०० मी धावणे, लांबउडी यामध्ये प्रथम क्रमांक- राज सचिन लाड, थाळीफेक – प्रथम : प्रियांका मलाप्पा टोणे द्वितीय माधुरी गणेश गावडे, लांबउडी द्वितीय कल्पना नंदकुमार गोसावी, द्वितीय रिले १७ वर्ष- मुली, १०० मी धावणे- द्वितीय रिया शिवा परब, १४ वर्षे मुली तृतीय, रिले १४ वर्षे मुलगे : तृतीय, लांबउडी द्वितीय शुभम तानाजी खिल्लारी, तृतीय: वेदांग धनावडे, गोळाफेक द्वितीय: भूवन लहानू गावडे, तृतीय- केदार मुकुंद डिचोलकर, २०० मीटर धावणे प्रथम भार्गवी रमेश पाटकर, भालाफेक द्वितीय : यश चाळकृष्ण आयरे, द्वितीय ४×१०० रिले.
प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक वाघमारे व सौ. गोसावी यांनी मेहनत घेतली. विद्याथ्यचि मुंबई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जे. जे. परब, स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापक गावकर, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
