शिवाजी वाचन मंदिराचा शतक महोत्सवी सांगता समारंभ १ जानेवारी रोजी

⚡मालवण ता.२२-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिराचे शतक महोत्सवी वर्ष १ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे, या निमित्ताने गेले वर्षभर दरमहा विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ रविवार दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत संपन्न होणार आहे.

या सांगता समारंभा प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, व प्रमुख अतिथी म्हणून दापोली येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. रेणुका दांडेकर उपस्थित राहणार आहेत. सत्कार, स्मरणिका प्रकाशन, बक्षीस वितरण, प्रमुख वक्त्यांचे भाषण, अध्यक्षीय भाषण होणार आहे. तरी सर्वांनी या समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन विश्वस्त, कार्यकारिणी मंडळ व कर्मचारी वृंद यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page