मालवण चर्मकार बांधवांची उद्या बैठक

⚡मालवण ता.२२-: चर्मकार समाजाचा मालवण प्रभाग मजबूत करण्यासाठी तसेच आजीव सभासद संख्या वाढविण्याकरिता मालवण प्रभागाची आढावा बैठक शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हेमंत माणगावकर व चंद्रकांत माणगावकर, मालवण यांच्या घरी होणार आहे.

तरी या बैठकीस मालवण प्रभागातील चर्मकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर व प्रभाग समिती अध्यक्ष श्याम चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page