१ जानेवारी रोजी मळगाव येथे भव्य पुरुष रस्सीखेच स्पर्धा

भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२२-: भिल्लवाडी ग्रुप मळगाव, सावंतवाडीच्यावतीने भव्य दिव्य अशी खुली पुरुष रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजता आझाद मैदान मळगाव येथे होणार आहे.

दरम्यान या खुल्या पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक २१ हजार १११ रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार १११ रुपये आणि तृतीय पारितोषिक ५ हजार १११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

खुल्या पुरुष गटातील बेस्ट फ्रेंड मॅन २ हजार १११आणि बेस्ट लास्ट मॅन २ हजार १११ तसेच प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
तरी इच्छुक संघाने अधिक माहितीसाठी भिल्लवाडी ग्रुपचे सदस्य पांडुरंग ९६१९२०२६८७, दिपेश ८९७५८४४९८९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page