जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांच्या मागणीला यश
⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषदे मार्फत सावंतवाडी शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी हा उपक्रम राबवला जाणार आहे असं पत्र नगरपरिषदेने जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानला दिले होते.अखेर शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत असल्याकारणाने कुत्र्यांच्या नसबंदी व्हावी या विषयी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी नगरपरिषद तीन महिन्यापूर्वी केलेल्या मागणीला अखेर यश आल असून आज पासून पुन्हा एकदा पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पकड मोहीम राबवण्यात आली.
तरी शहरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शाळा, महाविद्यालय , बाजारपेठ व मच्छी मार्केट या परिसरात असणाऱ्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे.
जस जसा फंड उपलब्ध होतील त्याप्रमाणे शहरांमध्ये हा उपक्रम पूर्णतः राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम पूर्णतः यशस्वी होण्यासाठी जिल्हा नियोजन मार्फत जास्तीत जास्त निधी उपलब्ध व्हावा यासाठी राजू मसुरकर यांनी पालकमंत्री मा.रवींद्र चव्हाण यांना निवेदन सादर केल आहे. तरी शहरातील नागरिकांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या वस्तीमध्ये असलेल्या भटक्या कुत्र्यांची माहिती नगरपरिष आरोग्य विभागाला कळवावी तसेच या उपक्रमासाठी सहकार्य करावे असे आवाहन जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले आहे.
