कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघात ८३ सरपंच भाजपचे विजयी
⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक सरपंच निवडून आणले. या यशात कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आम. नितेश राणे यांचे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आम. नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून या अधिवेशनात ला आमदार नितेश राणे हे ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि सर्वाधिक ग्रामपंचायतवर विजय मिळवल्यानंतर विधानसभेत पोहचले. यावेळी आम. नितेश राणे यांचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
