झाराप अपघातातील कोलगाव येथील युवकाचे उपचार दरम्यान निधन

⚡सावंतवाडी ता.२१-: थांबलेल्या इनोव्हा कारला बोलेरो पिकअपची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात सावंतवाडी कोलगाव येथील विधान परवार याचे गोवा बांबळी येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

याबाबतची अधिक माहिती अशी की झाराप येथे थांबलेल्या इनोवा कारला बोलेरो पिकप गाडीने जोरदार धडक दिली होती. यात विधान परवार हा गंभीर जखमी झाल होता.त्यांच्यावर गोवा बांबूळी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सर्वत्र कोलगाव येथे हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page