तांबोळी येथे भाजपवर नामुष्की
सावंतवाडी ता.२१-:तालुक्यातील तांबोळी गावात भाजपला जोरदार धक्का बसला असून, येथे ७ पैकी ६ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर केवळ एक उमेदवार भाजपचा निवडून आला आहे. तसेच सरपंच पद बिनविरोध झाल्याने ते भाजपकडे राहिले आहे. यापूर्वी येथे भाजपची एकहाती सत्ता होती. गावच्या विकासाच्या मुद्द्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या सहा उमेदवारांनी भाजप पुरस्कृत पॅनल ला शह देत जोरदार मुसंडी मारली आहे.
यामध्ये जगदीश आनंद सावंत, अर्चना अशोक सावंत, शर्मिला शिवराम सावंत, मिलिंद गणपत देसाई, मनीषा कानु हरिजन हे भरघोस मतांनी निवडून आले असून, विशाखा दयानंद सावंत यांची बिनविरोध निवड झाली आहे.
