भाजपच्या वर्चस्वाला महाविकास आघाडीचा धक्का;अनंत पिळणकर

कुर्ली ग्रा.पं. मध्ये सेना, राष्ट्रवादीचे तीन सदस्य विजयी

⚡कणकवली ता.२१-: भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कुर्ली ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे तीन सदस्य विजयी झाले आहेत. या ग्रा.पं. मध्ये भाजपच्या वर्चस्वाला महाविकास आघाडीने धक्का दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केला.
ग्रा.पं. प्रभाग एक मधून शिवसेनेच्या निलिमा पाटील, प्रभाग दोनमधून महाविकास आघाडीचे योगेश संकपाळ हे बिनविरोध विजयी झाले. तर प्रभाग तीन मधून राष्ट्रवादीचे योगेश कदम विजय यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. अशाप्रकारे सात सदस्यीय कुर्ली ग्रा.पं. मध्ये महाविकास आघाडीचे तीन सदस्य जबाबदार विरोधकांची भूमिका निभावणार आहेत. यासाठी महाविकास आघाडीचे गावातील सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर शिवसेनेचे वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके व शिवसेना नेते अतुल रावराणे यांचे सहकार्य लाभल्याचे श्री. पिळणकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page