वेतन पडताळणी पथक 26 ते 30 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी करण्यासाठी वेतन पथक दिनांक 26 ते 30 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती कोकण विभागाचे लेखा अधिकारी सुधीर समुद्रे यांनी दिली.

कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यास्तरीय शासकीय कार्यालयतील अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवापुस्तकांची महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 नुसार सातव्य वेतन आयोगाची पडताळणी करण्यासाठी वेतन पडताळणी पथकाचा दौरा जिल्ह्याच्या कोषागार कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. 

0000

You cannot copy content of this page