⚡मालवण ता.१९-: भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी गोळवण (ता.मालवण ) येथील स्पॉटलाईट फाऊंडेशनच्यावतीने दादर चैत्यभूमी येथे सुमारे ४ हजार बौद्ध अनुयायांना मोफत बिस्कीट व खाऊचे वाटप करून अभिवादन करण्यात आले. स्पॉटलाईट संस्थेच्या माध्यमातून गेली काही वर्षे महापरिनिर्वाणदिनी सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे.
गोळवण येथील स्पॉटलाईट फाउंडेशन ही संस्था सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढे असते. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन म्हणून बिस्किट व खाऊ वाटपाच्या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे स्पॉटलाईटचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते दादर चैत्यभूमी येथे ५ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजता एकत्र येऊन चैत्यभूमी येथे दाखल होणाऱ्या बौद्ध अनुयायांचे स्वागत खाऊ वाटून केले.
स्पॉटलाईट फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी चैत्यभूमी येथील बुध्दविहारात जाऊन डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले. या उपक्रमात ४ हजार बौद्ध अनुयायांना मोफत खाऊ वाटत करून सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यानंतर रात्री उशिरा चैत्यभूमी ते सिद्धिविनायक मंदिर अभिवादन रॅली केली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुकुंद पवार, प्रमोद पवार, अक्षय पवार, रोहित पवार , सुदेश पवार, दिपेश पवार, श्वेता पवार, सम्यक पवार, सविता वर्देकर, मीना वर्देकर, पुनम पवार, यश कदम, मंथन पवार, वेदांत पवार, सुरेश कदम, उमेश पवार , प्रदीप पवार, लवू पवार, अमोल पवार, मुकुंद पवार, सिध्दार्थ पवार आदी सदस्यांसह मित्रपरिवार उपस्थित होता.
