कणकवलीत माजी आम.प्रमोद जठार यांनी केला निषेध
⚡कणकवली ता.१७-: यूयॉर्क मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुस्तानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल मुक्ताफळे उधळली. बिलावल भुट्टो यांनी देश व पंतप्रधान व आरएसएसबाबत जे वक्तव्य केले,अमेरिकेने लादेनचा खात्मा केला, मात्र मोदींचा खात्मा केला नाही असे जे वक्तव्य केले
त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे भाजपा प्रदेश सचिव माजी आम.प्रमोद जठार यांनी दिली.
भाजप कणकवली संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रमोद जठार बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रविंद्र शेटये, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, संतोष पुजारे उपस्थित होते.
राष्ट्र सुरक्षा करण्यात पंतप्रधान यशस्वी झाले. सिमेवर तगडे सुरक्षा कवच निर्माण करण्यात आले. यामुळे पाकिस्तानात घबराहट असून त्यांना असुरक्षित वाटू लागले आहेत. पुर्वी भारतात अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ढासळत होती. मात्र, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची पाकिस्तानची हिंमत झालेली नाही. सर्जिकल स्ट्राईकनंतरतर ‘सर्जिकल स्ट्राईक झाकी है, पुरा पाकिस्तान बाकी है! हा इशारा पाकिस्तानला मिळाला. आपल्या देशाची १९४७ मध्ये जी फाळणी झाली, धार्मिक आधारावरील या फाळणीला महात्मा गांधी, डॉ. बाबसाहेब आंबेडकर व स्वातंत्रवीर सावरकर यांचा विरोध होता. मात्र, पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बॅ. जीना व आपल्याकडील काही मंडळींनी ही फाळणी केली. यामुळे हजारो लोक मारले गेले. यात करण्यात आलेली घाई नडली. आता सीमा रेषेवर बजेटपैकी ३० टक्के रक्कम खर्च दोन्ही देशांचा होत आहे.हे दोन्ही देशाला नुकसानीचे आहे.पाकिस्तानला दिवाळखोरीत आहे. त्यामुळे सातत्याने पाकिस्तानची मंडळी भारतविरोधी बोलत निवडून येत गेली. गेल्या ७५ वर्षांत भारत अनेक सुविधांच्या दृष्टया पुढे आला. पण पाकिस्तानने केवळ दहशतवाद, कसाब आणि अणवस्त्रच निर्माण केली. दुसऱ्याचा राग करत त्यांनी स्वतःच घर पेटवल आहे. आज देश मोदींसोबत आहे. राममंदिर, ३७० कलम रद्द आता समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रणसारखे कायदे आणून पुढील २०२४ मध्येही नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वासही श्री. जठार यांनी व्यक्त केला.
