नगरसेवक विलास कुडाळकर यांचा पुढाकार:मतदारांना छायाचित्र सुद्धा दिली मोफत काढून..
⚡कुडाळ ता १९-: विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन अंतर्गत मतदारांना देण्यात आलेले मतदार गणना पत्रक मध्ये चूक होऊ नये म्हणून कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिर मध्ये मतदारांसाठी नगरसेवक व बीएलए विलास कुडाळकर यांच्या माध्यमातून मदत व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते यामध्ये सुमारे २०० मतदारांनी सहभाग घेतला आणि आपले मतदार गणना पत्रक भरणा केले.
शासनाने एसआयआर म्हणजे विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन कार्यक्रम जाहीर केला आहे यामध्ये मतदार यादी मधील मयत, दुबार मतदारांना वगळणे आणि यादी अद्यावत करणे हा प्रामुख्याने कार्यक्रम आहे. या मतदार यादी पुनरावलोकन कार्यक्रमांमध्ये मतदारांकडून दिलेले मतदार गणना पत्रक चुकू नये म्हणून शिवसेना नगरसेवक तथा बीएलए विलास कुडाळकर यांनी बुथ क्रमांक २१७ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्या मतदारांसाठी समाज मंदिर मध्ये मतदार गणना पत्रक मदत व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते या शिबिराला मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये मतदार गणना पत्रक भरून घेण्यात आले यासाठी शासनाने नियुक्त केलेले बीएलओ श्रेया गावडे, सहाय्यक बीएलओ योगिता कुडाळकर यांनी सहकार्य केले एकाच ठिकाणी हे गणना पत्रक भरून घेण्यात आल्यामुळे मतदारांना सुद्धा चांगली माहिती मिळाली. यावेळी शाखाप्रमुख नितेश कुडाळकर, जनार्दन कुडाळकर, किशोर कुडाळकर, संतोष कुडाळकर, हर्षल मालवणकर, दत्तप्रसाद जाधव आदी उपस्थित होते. तसेच ज्या मतदारांना मतदार गणना पत्रकासाठी नव्याने छायाचित्र आवश्यक होते त्या मतदारांचे मोफत छायाचित्र काढून देण्यात आले.
