वीज वितरण उपअभियंता भुरे यांचे सामाजिक बांधिलकी संघटनेला आश्वासन
⚡सावंतवाडी ता.१३-: येथील शहरातील रहदारीच्या ठिकाणी जीर्ण झालेला पोल येत्या 20 डिसेंबर नंतर बदलण्यात येईल असे आश्वासन उपअभियंता भुरे यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांना दिले.
याबाबत आज सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी भुरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन देऊन लक्ष वेधले.
