बांदा सरपंच अक्रम खान यांचे वाराणसी गंगाघाट पूजनावेळी सांगणे
बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला शत प्रतिशत यश मिळू रे असे साकडे बांदा सरपंच अक्रम खान यांनी वाराणसी येथे गंगा घाट पूजनावेळी घातले. यावेळी त्यांनी गंगेचे दर्शन घेत विधिवत पूजन केले. यावेळी त्यांच्यासोबत मांद्रे-गोव्याचे आमदार जीत आरोलकर उपस्थित होते.
खान म्हणाले की, केंद्रात, राज्यात, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत भाजपची सत्ता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावापातळीवर देखील ९० टक्के सत्ता ही भाजपची आहे. आता जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्याने या सर्व ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येऊन अशी प्रार्थना आपण गंगे चरणी केल्याचे त्यांनी सांगितले. वाराणसी येथे देश विदेशातील लाखो भाविक हे दररोज गंगे चरणी नतमस्तक होतात. हे पवित्र स्थान असून याठिकाणी व्यक्त केलेली मनोकामना ही पूर्णत्वास येते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला १०० टक्के निर्भेळ यश मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
