सावंतवाडी ता.०३-: झाराप खानमोहल्ला येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जखमी झाल्याची घटना घडली आहे. सैजान उमर खान ( रा. बाहेरचा वाडा सावंतवाडी ) असे त्याचे नाव असून अपघातानंतर जखमेव असते त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
झाराप येथिलसामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर यांनी आपल्या खाजगी वाहनाने त्याला रुग्णालयात दाखल केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग नेते शफिक खान जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस आबा पिळणकर व विलास नर यांनी यासाठी पुढाकार घेतला.
