व्हि एन नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल मडूरा येथे क्रीडा महोत्सव संपन्न

बांदा/प्रतिनिधी
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित मडूरा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी शारदा शिक्षण सोसायटी म्हापसा गोवाचे शैलेंद्र आरणीकर, लोकल कमिटी चेअरमन भिकाजी धुरी, शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे सुभाष मोर्ये, पालक सदस्य सौ अदिती वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका प्रतीक्षा शिरोडकर यांनी प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सौ. शिरोडकर यांनी प्रस्ताविकात शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला व त्याचबरोबर खेळांचे महत्त्व विषद केले.
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. पूर्व प्राथमिक व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी रिबन व्यायाम, डंबेल्स व्यायाम व पिरॅमिड सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे लाभलेले शैलेंद्र आरणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितलेच त्याचबरोबर मैदानावर विविध खेळांचे महत्त्व देखील पटवून दिले. सुभाष मोर्ये यांनी देखील विद्यार्थ्यांना खेळांचे महत्त्व सांगितले. निरोगी रहा व शाळेतील राज्य, जिल्हा, विभाग पातळीवर कसे पोहोचाल याबाबत मार्गदर्शन केले.
लिंबू चमचा, बॅलन्स बुक, होपिंग रेस, बॉल इन द बास्केट, पोटॅटो रेस , लॉंग जंप, पॅरामिड ग्लास, लंगडी, डॉजबॉल रिले रेस, बॉल ओवर आर्म या खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर, सहशिक्षिका वेलांकनी रॉड्रीग्स, तेजस्वी गावडे, प्राची परब उपस्थित होते. सूत्रसंचालन वेलंकनी रॉड्रीग्स , तर आभार तेजस्वी गावडे यांनी मानले.
फोटो :-
मडुरा नाबर प्रशालेत क्रीडा महोत्सवाचे क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून उदघाट्न करताना शैलेंद्र आरणीकर. सोबत भिकाजी धुरी, सुभाष मोर्ये व इतर.

You cannot copy content of this page