⚡मालवण ता.०३-: मालवण तालुका पत्रकार समिती, भंडारी समाज महासंघ आणि आर पी बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर रविवार ४ डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत आर पी बागवे हायस्कूल मसूरेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमा शुल्क भारत सरकारचे सत्यवान यशवंत रेडकर हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. सदर मार्गदर्शन शिबिर विनाशुल्क असून तालुक्यातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी याचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी
अर्चना कोदे मोबा.९४२०८२२५५२
आणि दत्तप्रसाद पेडणेकर ९४२११४५८२७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
